Jasprit Bumrah च्या आजोबांचा मृतदेह सापडल्याने खळबळ | Lokmat News

2021-09-13 62

टीम इंडियाचा क्रिकेटर जसप्रीत बुमराह यांचे आजोबा संतोष सिंह बुमराह यांचा मृतदेह गुजरातच्या साबरमती नदीत सापडला आहे. ते 84 वर्षाचे होते, उत्तराखंड येथून ते अहमदाबादला जसप्रीतला भेटण्यासाठी गेले होते. मात्र या दोघांची भेट होऊ शकली नाही. ते अहमदाबादहून निघून घरी पोहचले नाहीत या गोष्टीला काही दिवस गेले म्हणून पोलिसात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. अहमदाबाद फायर अँड इमर्जन्सी सव्‍‌र्हिसच्या कर्मचा-यांनी साबरमती नदीतून संतोष सिंह यांचा मृतदेह बाहेर काढला.
संतोष सिंह जसप्रीतला भेटायला अहमदाबादला गेले होते, पण तिथे त्यांची कोणासोबतच भेट झाली नाही. मागील शुक्रवारपासून माझे वडील बेपत्ता झाल्याची माहिती संतोष सिंह यांची मुलगी राजिंदर कौरने पोलिसांना दिली. तसेच ते घरी न परतल्याने ते बेपत्ता झाल्याची तक्रारही आम्ही पोलिसात नोंदवल्याचेही कौर यांनी सांगितले. पोलीस या प्रकरणी तपास करत असतानाच त्यांना साबरमती नदीत एक मृतदेह आढळला. जो संतोष सिंह यांचाच असल्याची खात्री पटली आणि त्यानंतर बुमराहचे आजोबाच असल्याचीही माहिती समोर आली.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews